कांस्यथाळी – आपल्याकडे आयुर्वेदावरील ग्रंथामध्ये “पादाभ्यंग” सांगितलेले आहे त्यात कास्याच्या वाटीने पायाला गायीचे तूप किंवा खोबरेल तेल चोळणे हा प्रमुख उपचार सांगितला आहे त्याचे फायदे खालीलप्रमाणे:-
◆ शरीरातील वाताचे प्रमाण कमी करण्यासाठी
◆ शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी
◆डोळ्याच्या स्नायूंना चालना मिळण्यासाठी
◆शरिरातील थकवा कमी होऊन थंडावा वाढविण्यासाठी
◆मधुमेहामुळे होणाऱ्या पायाच्या संवेदना कमी होण्यासाठी
◆निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहण्यासाठी
◆पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी
◆गुढघेदुखी, टाच दुःखी, कंबरदुखी अशा त्रासाचे प्रमाण कमी करण्यासाठी
◆पायावरची सूज कमी करण्यासाठी
◆तळव्याला भेगा पडणे तसेच पायाची जळजळ होणे या समस्या कमी करण्यासाठी
◆व्हेरिकोज व्हेन्स वर उपयुक्त
◆डोळ्याखालील काळेपणा कमी करण्यासाठी
◆चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी
काशाच्या वाटीने पायाला मसाज करताना तेल किंवा तुपाचा वापर करणे आवश्यक आहे. तुपाऐवजी पायाला मसाज करताना कोमट तिळाच्या तेलाचा किंवा खोबरेल तेलाचाही वापर करू शकता.